कात्रज : मृत्यूचा सापळा बनलाय कात्रज-कोंढवा रस्ता

चार वर्षात १५ जणांचा मृत्यू तर २५जण गंभीर जखमी
कात्रज : मृत्यूचा सापळा बनलाय कात्रज-कोंढवा रस्ता
कात्रज : मृत्यूचा सापळा बनलाय कात्रज-कोंढवा रस्ताsakal

कात्रज : कात्रज कोंढवा रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूकीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. २०१८साली रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन झाल्यापासून कात्रज ते खडीमशीन चौक या साडेतीन किलोमीटरच्या मार्गात एकूण ३९ अपघात झाल्याची नोंद भारती विद्यापीठ आणि कोंढवा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. यामध्ये किरकोळ अपघातांची नोंद नाही. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी या रस्त्यांच्या रुंदीकरणाची आखण्यात आलेली योजना हवेतच विरली असल्याचे दिसून येत आहे.

कात्रज कोंढवा रस्त्यांवरील कात्रज चौक ते गोकुळनगर चौकापर्यंत भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनची हद्द येत आहे. यामध्ये या २०१८पासून एकूण २७ अपघातांची नोंद करण्यात आली असून यामध्ये १२ जणांचा मृत्यू तर १७ जण गंभीर जखमी झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर गोकुळनगर चौक ते खडीमशीन चौकांपर्यंत कोंढवा पोलिसांची हद्द येत असून यामध्ये २०१८पासून एकूण १२ अपघातांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून ०९ जण गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे.

कात्रज : मृत्यूचा सापळा बनलाय कात्रज-कोंढवा रस्ता
एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

२०२०साली कोरोनामुळे जगभरात लागलेल्या टाळेबंदीमुळे काही प्रमाणात अपघातांची संख्या घटल्याचे कात्रज-कोंढवा रस्त्यांवरही पाहायला मिळाले. परंतु, २०२१ला टाळेबंदी शिथिल होऊन रस्त्यांवरील रहदारी वाढण्यास सुरवात झाल्यावर अपघाताच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. त्याचबरोबर रस्त्यांवर काही ठिकाणी पडलेली खडीही अपघातास कारणीभूत ठरत आहे. रस्त्यावरून एका तासाला साधारणतः ७ ते ८ हजार वाहनांची वाहतूक होते. यामध्ये मोठ्या वाहनाचे प्रमाण लक्षणीय आहे. अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाणही जास्त असल्याचे दिसून येते.

वर्ष-एकूण-अपघात-मृत्यू-जखमी

२०१८ - ११ - ०५ - ०६

२०१९ -१५ - ०४ -१३

२०२० -०३ - ०१ -०२

२०२१ - १० -०५ - ०५

रस्त्याचे काम वेळेत होणे अपेक्षित होते. हे काम वेळेत होत नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. मोठ्या प्रमाणांवर अपघातही होतात. कितीतरी अपघातांची नोंदही होत नाही. किरकोळ अपघात तर रोजचेच ठरलेले आहेत. - पराग भेलके, नागरिक, कात्रज-कोंढवा रस्ता परिसर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com