
Pune Latest News: कात्रज-कोंढवा रस्ता कामासाठी राज्य शासनाने १३९ कोटी रुपये उपलब्ध करुन दिल्यानंतरही भूसंपादन झाले नाही. याबाबत विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हिवाळी अधिवेशनापूर्वी हे काम पूर्ण करावे आणि कामाच्या विलंबास दोषी असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.