Katraj-Kondhwa road gets March 2027 completion deadline.
sakal
पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम रखडलेले असताना या ठिकाणी झालेल्या अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्याचे पडसाद उमटले. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन महापालिकेत आंदोलन करून अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. महापौर मंजुषा नागपुरे यांनी आयुक्त नवल किशोर राम यांना प्रशासनाची जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश दिले. पण तीन तास चर्चा होऊनही ठोस आश्वासन व कारवाई झाली नाही. केवळ आयुक्तांनी हे ५० मीटरच्या रुंदीकरणाचे काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण केले जाईल असे आश्वासन दिले.