

Katraj-Kondhwa Road
esakal
कात्रज: कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी महापालिका आयुक्तांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आणि अडथळे तातडीने दूर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आयुक्तांच्या पाहणीला पंधरा दिवस उलटूनही विद्युत विभागाकडून कार्यवाही झालेली नसल्याने रस्त्याच्या मध्यभागी उभे असलेले विजेचे खांब अद्याप ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे रस्ता रुंदीकरणासह कात्रज उड्डाणपुलाच्या रॅम्पच्या कामालाही अडथळा निर्माण होणार आहे.