katraj Lake Flag
sakal
कात्रज - कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावाशेजारील मैदानात उभारण्यात आलेला शहरातील सर्वात मोठा ध्वज यंदा १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी फडकविण्यात आला नाही. गेल्या दहा वर्षांपासून तिरंगा फडकविण्याची अखंड सुरू असलेली परंपरा प्रथमच खंडित झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून महाराष्ट्राच्या अस्मितेलला धक्का लागल्याची नागरिकांची भावना निर्माण झाली आहे.