

Administrative Delay Peaks in Katraj Road Project
Sakal
कात्रज : कात्रज तलाव ते वरखडेनगर चौक या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याचे काम मागील वर्षापासून संथगतीने सुरू असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गुजर-निंबाळकरवाडी व सातारा रस्त्याकडे जाण्यासाठी हा रस्ता प्रमुख दुवा असतानाही, केवळ कामाच्या नावाखाली रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने नागरिकांतून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.