कात्रज दूध दरवाढ या दिवसापासून येणार अमलात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

  • कात्रज दूध दरवाढ गुरुवारपासून अमलात

पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) गाय आणि म्हशीच्या दुधाच्या विक्रीदरात केलेली प्रतिलिटर दोन रुपयांची दरवाढ येत्या गुरुवारपासून ता.6) अमलात येणार आहे. या दरवाढीच्या अंमलबजावणीमुळे ग्राहकांना आता गायीचे (टोण्ड) दूध प्रतिलिटर 48 रुपये, प्रमाणित दूध 54 रुपये, तर मलई दूध आणि म्हशीचे दूध 58 रुपये लिटरने खरेदी करावे लागणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या गाईच्या दुधाचा विक्री दर प्रतिलिटर 46 तर, म्हशीच्या दुधाचा 56 रुपये लिटर आहे. राज्यातील सर्व खासगी व सहकारी दूध उत्पादक संघांच्या डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.

भारताचा विकासदर राहणार एवढा; फिच रेटिंग्सचे अनुमान

या निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2020 पासून अमलात आणण्याचेही ठरले होते. त्यानुसार राज्यातील अनेक दूध संघांनी 1 जानेवारीपासून ही दरवाढ लागू केलेली आहे. मात्र कात्रज डेअरीने ही दरवाढ अमलात आणली नव्हती. त्यामुळे हा निर्णय जुनाच असून, त्याची केवळ अंमलबजावणी 6 फेब्रुवारीपासून केली जात असल्याचेही डॉ. क्षीरसागर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: katraj milk prices will hike from Thursday

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: