Pune Education : शिक्षण संचालकांच्या आदेशानंतर कात्रजमधील मुनोत विद्यालय पुन्हा सुरू करण्याचा आदेश
PMC Action : कात्रजमधील मुनोत शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर शिक्षण संचालकांच्या आदेशाने शाळा पुन्हा सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आले.
कात्रज : शिक्षक आणि संस्थाचालक यांच्या संघर्षामुळे कात्रजमधील मुनोत प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय सोमवारपासून (ता. १६) शाळा सुरू झाल्यानंतर बंद होते. ते सुरू करण्याचा आदेश राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिला.