Nanasaheb Peshwe Lake water pollution
esakal
कात्रज : शेलारमळ्यातून कात्रज तलावाकडे जाणाऱ्या ओढ्यातील नादुरुस्त सांडपाणी वाहिनीतून दूषित पाणी थेट नानासाहेब पेशवे तलावात मिसळत आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसह ओढ्यालगतच्या रहिवाशांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागत (Nanasaheb Peshwe Lake water pollution) आहे. विशेष म्हणजे २०२२ मध्ये महापालिकेने सुमारे १० कोटी रुपये खर्चून टाकलेल्या सांडपाणी वाहिनीचा अपेक्षित उपयोग होत नसल्याचे या प्रकारातून समोर आले आहे.