Tiger : पुण्याची भक्ती वाघीण गेली जयपूरला

राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील भक्ती वाघीण जयपूर येथील नाहरगड जैविक उद्यानात पाठविण्यात आली आहे. प्राणी अदलाबदल कार्यक्रमांनुसार हा बदल करण्यात आला आहे.
Bhakti Tiger
Bhakti Tigersakal

कात्रज - राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील भक्ती वाघीण जयपूर येथील नाहरगड जैविक उद्यानात पाठविण्यात आली आहे. प्राणी अदलाबदल कार्यक्रमांनुसार हा बदल करण्यात आला आहे. पुण्यात आता तीन लांडगे आणि एक मादी तरस जयपूरवरून आणण्यात आले आहेत. जयपूरमध्ये नाहरगड जैविक उद्यान सुरू होत आहे. यामध्ये टायगर सफारी असल्याने देशातील विविध भागातून वाघ आणले जाणार आहेत. त्यानुसार पुण्यातून भक्ती वाघीण पाठविण्यात आली आहे.

राजस्थान वन विभागाचे कात्रजच्या प्राणी संग्रहालयाला मिळालेले तीन लांडगे आणि एका तरस वरिष्ठ वन्यजीव चिकित्सक डॉ. अरविंद माथुर यांच्या नेतृत्वाखाली आणण्यात आले. नाहरगड येथील उद्यानात भक्ती वाघिणीला २१ दिवस विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर तिला वाघांच्या पिंजऱ्यात सोडले जाणार आहे.

नागपूर येथून देखील वाघ वाघिणीची जोडी जयपूरला नेण्यात येणार आहे. नाहरगड जैविक उद्यान ३० वर्ग हेक्टर क्षेत्रात तयार करण्यात आले असून त्यासाठी साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. आठ किलोमीटर लांबीच्या ट्रॅकवरून पर्यटकांना ४५ मिनिटे वाघ पाहत येतील. तेथे पुण्याची भक्ती वाघीण् मुख्य आकर्षण असेल.

ऑगस्ट २०२१ मध्ये प्राणी हस्तांतरण प्रक्रियेअंतर्गत निलगाईच्या मोबदल्यात छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील भक्ती आणि अर्जून वाघाची जोडी कात्रज उद्यानात आणण्यात आली होती. भक्ती वाघीणेचे सध्याचे वय साडेसहा वर्ष होते.

जयपूरवरून आणलेले तीन लांडगे आणि एका मादी तरसाला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. पर्यटकांच्या सार्वजनिक प्रदर्शनासाठी त्यांना पुढील महिनाभरात खुले करण्यात येईल.

- राजकुमार जाधव, संचालक, राजीव गांधी प्राणी संग्रहालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com