

Katraj Zoo Online Booking Receives Overwhelming Response
Sakal
कात्रज : कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील ऑनलाईन तिकीट बुकिंग प्रणालीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाईन बुकिंग सेवा सुरु झाल्यापासून म्हणजेच, गेल्या दोन वर्षांत या सुविधेद्वारे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. १ जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत सुमारे ५ लाख ४४ हजार ०६३ पर्यटकांनी उद्यानाच्या ऑनलाईन बुकिंगचा लाभ घेतला. या माध्यमातून उद्यान प्रशासनाला सुमारे २ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.