
पुणे : शहराचे दक्षिण प्रवेशद्वार म्हणून सातारा रस्ता परिसराची ओळख आहे. जुना कात्रज बोगदा ते कात्रज रस्ता हा निसर्गरम्य हिरवाईने नटलेला परिसर असून, रस्ता अरुंद आहे. या परिसरात नागरिक मोठ्या प्रमाणावर कचरा टाकतात. मात्र, तो महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दैनंदिन स्वच्छ केला जातो.