Katraj Tunnel : नवीन कात्रज बोगद्यात अपघाताची शक्यता; रम्य प्रवेशद्वार आता धोका बनतोय
Pune Traffic : कात्रज बोगद्यातून वाहणारे पाणी आणि नवले पुलाजवळ वारंवार होणारे अपघात यामुळे पुणे प्रवेशद्वार सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गंभीर बनले आहे.
पुणे : कोल्हापूरहून पुण्याकडे येणाऱ्या वाहनचालकांसाठी नवीन कात्रज बोगदा एक महत्त्वाचे प्रवेशद्वार आहे. डोंगर, हिरवळ आणि निसर्गसौंदर्य अनुभवत वाहनचालक पुण्यात प्रवेश करतात. मात्र, या रम्य वाटेवर आता अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.