Katraj Water Crisis : कात्रजकरांची पाण्यासाठी वणवण

आम्हाला शेवटी पाण्याचा टँकर मागवण्याची वेळ आल्याचे सुखदा वरदा संकुल सोसायटीचे नंदकुमार कमलापुरे यांनी सांगितले
katraj water supply crisis technical error in water pump pune marathi news
katraj water supply crisis technical error in water pump pune marathi newsSakal

कात्रज : राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाजवळील पंपिग स्टेशवरील पंपामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कात्रजकरांना पाण्यासाठी दोन दिवसांपासून वणवण करावी लागत असल्याचे चित्र आहे. ऐन सणासुदीत पाण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली असून केदारेश्वर टाकीला जाणाऱ्या पंपात बिघाड झाल्याने पंप बंद पडला होता. त्यामुळे पाणीपुरवठा झाला नाही. परिणामी, नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले.

सुखसागरनगर भाग १, भाग २ राजस सोयायटी, शिवशंभोनगर गल्ली क्रमांक १,२,३, साईनगर, शेलारमळा आदींसह सुखदा वरदा संकुल, चैत्रांगण, सुखनिवास, हॅमी पार्क, आयडीयल पार्क, पवन पार्क आदी सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठा न झाल्याने नागरिक त्रस्त झाले.

नवरात्र उत्सव सुरू असून, पाणी नसल्याने महिलांची चिडचिड झाली. सातत्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त असतानाच पाणीपुरवठा खंडित झाल्याने आणखीनच त्रासाला सामोरे जावे लागल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

पाणी पुरवठा होणार आहे की नाही, याबाबत कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना संपर्क केल्यास फोन बंद असतात. याचा अर्थ कर्मचारी सरळ सरळ जबाबदारी झटकतात, नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोईबद्दल कोणालाही काहीही देणेघेणे नसते.

पाणी पुरवठा खंडित होणार असल्याची पूर्वसूचना दिल्यास काहितरी व्यवस्था करता येते. आम्हाला शेवटी पाण्याचा टँकर मागवण्याची वेळ आल्याचे सुखदा वरदा संकुल सोसायटीचे नंदकुमार कमलापुरे यांनी सांगितले.

नवरात्रोत्सवानिमित्त महिलांचे उपवास असतात. सणासुदीला पाण्याची अशी गंभीर परिस्थिती निर्माण होणे योग्य नाही. महापालिकेने पंपात बिघाड झाला तरी तत्काळ पर्यायी व्यवस्था करुन नागरिकांना दिलासा द्यायला हवा.

- तुषार कदम, स्थानिक नागरिक

पंपामध्ये बिघाड झाल्याने पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. आम्ही विद्युत विभागाकडून युद्धपातळीवर पंपाची दुरुस्ती करुन घेतली आहे. लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- नितिन खुडे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com