

Crow Trapped in Kite String Rescued Safely
Sakal
कात्रज : आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी होत चाललेल्या समाजातही माणुसकी, करुणा आणि सामाजिक जबाबदारी जिवंत असल्याचे दर्शन कात्रज येथील यशश्री सोसायटी परिसरात आज सकाळी घडलेल्या एका घटनेतून झाले. अडकलेल्या आणि असहाय अवस्थेत असलेल्या एका कावळ्याचे वेळेत रेस्क्यू करून त्याचे प्राण वाचवण्यात आले. ही बाब सर्वप्रथम बी आर गायकवाड आणि राजाराम भालेराव यांच्या लक्षात आली.