कात्रज : दोन महिन्यांपासून सफाई कामगारांचे वेतन थकित

कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयातील प्रकार
सफाई कामगार
सफाई कामगारesakal

कात्रज : कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयातील कंत्राटी सफाई कामागरांचा पगार केवळ निविदा प्रक्रिया राबवताना घोळ झाल्यामुळे दोन महिन्यांपासून थकित आहे. नवीन निविदा प्रक्रिया राबवताना काही ठेकेदारांनी आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल केली. यावर न्यायालयाने निर्णय देत १६ सप्टेंबरपर्यंत या निविदा प्रक्रियांवर स्थगिती दर्शविली. त्यामुळे कामगारांचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पगार झाला नाही.

दोन महिन्यांपासून वेतन रखडल्याने मात्र कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सफाई कामगारांची ऐन गणपतीच्या सणात होरफळ होत आहे. कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे. कामगारांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे वेतन अद्याप मिळाले नाही. यापुढे सप्टेंबर महिना पूर्ण सणासुदीचा आहे अशा परिस्थितीत कामगार कामावर न आल्यास परिस्थिती बिकट होणार आणि कचरा न उचलला न गेल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जुलै महिन्याचा आम्हाला पगार मिळाला नाही. आता ऑगस्ट महिनासुद्धा पूर्ण भरला आहे. आमचे घरभाडे थकले असून हातावरचे पोट आहे. दोन महिन्यांपासून किराणा भरलेला नाही. घरखर्च भागवणे कठीण झाले आहे. त्यातच गणपतीता सण सुरु झाला असून ऐन सणासुदीत आमच्यावर ही वेळ आली आहे. ठेकेदारांकडून आम्हाला कोणत्याही प्रकारची व्यवस्थित माहिती दिली जात नसल्याची व्यथा शिवशंभोनगर आरोग्य कोठीवरील महिला सफाई कामगारांनी मांडली.

जुलै महिन्याचे वेतन कामगारांना मिळालेले नाही. मात्र चालू मे महिन्याचे वेतन त्यांना लवकरच देण्यात येईल. न्यायालयाने स्थगिती दिल्याने हा घोळ निर्माण झाला असला तरी जुलै महिन्याचे वेतन पुढील दोन दिवसांत करण्यात येतील. तशा सूचना सहायक आयुक्तांशी बोलून ठेकेदारांना देण्यात येतील.

संदीप कदम, उपायुक्त, महापालिका परिमंडळ ४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com