
पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात १६ चितळ जातीच्या हरणांचा मृत्यू लाळखुरकूत आजारामुळे झाल्याचे समोर आले. या हरणांना दिलेला खुराक चांगला होता की नाही? यावरून प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांपेक्षा अधिकाऱ्यांवरच कारवाईची शक्यता वाढली आहे. महापालिका आयुक्तांनी कडक पाऊल उचलत उद्यान विभागाचे अधीक्षक अशोक घोरपडे, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. चार दिवसांत त्यांना खुलासा करण्याचा आदेश दिला आहे.