
कात्रज : कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात गेल्या काही दिवसांत १६ हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये २ नर आणि १४ मादी चितळांचा समावेश असून ७ जुलै ते १२ जुलैदरम्यानपर्यंत या १६ त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे वन्यजीवप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत गर्दीने फुलणाऱ्या या संग्रहालयात वाघ, सिंह, मगर, माकडांसारख्या अनेक प्रजातींबरोबरच ९८ हरणांचा स्वतंत्र अधिवास होता. मात्र, मागील चार ते पाच दिवसांत तब्बल १६ हरणे मृतावस्थेत आढळल्याची बाब समोर आली असून ही बाब चिंतेची आहे.