नगरसेवक लेकीसह सदस्यांचा सत्कार
बेगमपुरात कावळे कुटुंबीयांकडून पदाधिकाऱ्यांचा सत्कार
बेगमपूर, ता. ५ ः येथील (स्व.) सोपान सौदागर कावळे यांची लेक व सध्या सोलापूरच्या रहिवासी असलेल्या पूनम प्रभाकर काशीद या महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. कुटुंबातील लेक नगरसेवक झाली या आनंदाप्रीत्यर्थ लेकीसह नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे कावळे कुटुंबीयांनी आयोजन केले. अध्यक्षस्थानी कुरुल जिल्हा परिषद गटाचे सदस्य सचिन जाधव होते. नगरसेवक पूनम काशीद, घोडेश्वर पंचायत समिती गणाचे सदस्य अस्लम चौधरी व माजी नगरसेवक प्रभाकर काशीद होते. यावेळी सौदागर कावळे, दिगंबर कावळे, माजी उपसरपंच हणमंत कावळे, महादेव कावळे, नानासाहेब कावळे, उदय कावळे, अमर कावळे, उत्तम कावळे, समाधान कावळे, अप्पासाहेब कावळे, पृथ्वीराज कावळे, समर्थ कावळे, माजी सरपंच लक्ष्मण माने, हरिभाऊ काकडे, उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती सदस्य अस्लम चौधरी, माजी नगरसेवक प्रभाकर काशीद यांनी मनोगत व्यक्त केले.

