
केडगाव - ‘असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखूनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर’, ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांच्या कवितेप्रमाणे एका मुलाने खरोखर आयुष्याला उत्तर दिले आहे. इयत्ता पहिलीत असताना पोलिओमुळे दोन्ही पाय कमरेपासून खाली लुळे झाले.