
केडगाव : वाखारी (ता. दौंड) येथील न्यू अंबिका कला केंद्रात हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या चौघांवर यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गोळीबारात कोणीही जखमी नाही, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी बुधवारी दिली. दरम्यान, राजकीय पदाधिकाऱ्यांशी संबंधित नातेवाइकाने हा प्रकार केल्याच्या चर्चेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.