उद्योजक होऊ पाहणाऱ्यांना ताकद देत स्वतःचे व्हिजन मोठे ठेवा - छत्रपती संभाजीराजे

'मराठी माणसाला, नवीन उद्योजकांना आणि उद्योजक होऊ पाहणाऱ्यांना ताकद देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी महासंघाने काम करावे.
Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapatiesakal
Summary

'मराठी माणसाला, नवीन उद्योजकांना आणि उद्योजक होऊ पाहणाऱ्यांना ताकद देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी महासंघाने काम करावे.

पुणे - 'मराठी माणसाला, (Martahi People) नवीन उद्योजकांना (Businessman) आणि उद्योजक होऊ पाहणाऱ्यांना ताकद (Power) देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी महासंघाने काम करावे. ही मदत करीत असताना असताना स्वतःचे व्हिजन देखील मोठे ठेवा,' असा सल्ला खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी शुक्रवारी (ता.8) बांधकाम व्यावसायिकांना दिला.

पुण्यामध्ये गेली २१ वर्षे मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन कार्यरत असलेल्या असोसिएशनचे काम महाराष्ट्र पातळीवर नेण्याच्या उद्देशाने ‘मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघ’ ही शिखर संस्था स्थापन करण्यात आली आहे. या महासंघाच्या स्थापनेची घोषणा करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात संभाजीराजे बोलत होते. क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, असोसिएशनचे अध्यक्ष नंदू घाटे, संस्थापक अध्यक्ष एस.आर. कुलकर्णी, महासंघाचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे आणि कार्याध्यक्ष अंकुश आजबे यावेळी उपस्थित होते.

संभाजीराजे म्हणाले, 'आपले भूमिपुत्र सुरक्षित कसे होतील, यासाठी महासंघ करीत असलेले काम कौतुकास पात्र आहे. तुम्हाला ताकद देण्यासाठी व तुम्ही कुठे कमी नाही हे सांगण्यासाठी मी येथे आहे. गरीब मराठी मुलांना ताकद कशी देता येईल, याचा विचार नेहमी करावा. आपले संस्कार आणि कला या प्रवासात जपले पाहिजे.'

कुळकर्णी म्हणाले, 'मराठी बांधकाम व्यावसायिकांसाठी काही तरी करावे या उद्देशाने सुरू झालेल्या या संघटनेचे काम आज राज्यभर पोहचले ही बाब अभिमानास्पद आहे. मराठी माणसाचा व्यवसाय हा जगभर पसरला पाहिजे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी मराठी माणसांमधील व्यावसायिकता वाढली पाहिजे.'

डॉ. हावरे म्हणाले, 'संघटनेचे बळ असेल तर आपण काहीही साध्य करू शकतो. आपला आवाज पोहचला नाही तर आपण बारीक वाटतो. पण आपण बारीक नाही. त्यासाठी आपण संघटीत झालो पाहिजे.'

मगर म्हणाले, 'आपले उद्धिष्ट हे मराठी माणसाचे व व्यावसायिकांचे हित सांभाळले आहे. कोणाच्या दावणीला बांधून न राहता स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे. राजकीय बांधिलकी न ठेवता आपण काम करू.'

महासंघाच्या स्थापनेच्या कार्यक्रमानंतर डॉ. हावरे यांनी मगर आणि सल्लागार समितीचे मिलिंद देशपांडे यांची जाहीर मुलाखत घेतील. यावेळी दोघांनी पुण्यासह राज्यातील बांधकाम क्षेत्र आणि बांधकाम व्यावसायिक संघटनेच्या अनेक मुद्यांवर आपली मते मांडली. नंदू घाटे यांनी प्रास्ताविक केले. असोसिएशनच्या कामकाजाचा आढावा त्यांनी मांडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com