केममधील युवकांचा आदर्श उपक्रम - रविवार स्वच्छतेचा

केममधील युवकांचा आदर्श उपक्रम - रविवार स्वच्छतेचा
Published on

KEM26B00582
केम (ता. करमाळा) ः स्वच्छता अभियानात सहभागी युवक.

केममध्ये युवकांचे ‘स्वच्छता अभियान’; दर रविवारी श्रमदान
सहाव्या रविवारी उत्तरेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता; अधिकाऱ्यांनी केले कौतुक

केम, ता. २८ : गावातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी केममधील युवकांनी एकत्र येत, दर रविवारी स्वच्छता अभियान सुरू केले आहे. या उपक्रमाचा सहावा रविवार नुकताच झाला. यावेळी श्री उत्तरेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. रस्ते व नाले साफ करण्याबरोबरच ओला व सुका कचरा वेगळा करण्यात आला.

या उपक्रमात दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, करमाळ्याचे गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, ग्रामविकास अधिकारी वैभव तळेकर तसेच छत्रपती शासन ग्रुपचे प्राणजीत गवंडी यांनी सहभागी होत युवकांना प्रोत्साहन दिले. यापूर्वी केममधील सुयश क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी तळेकर गल्ली परिसरातील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता.
गावातील विविध गल्ल्या, सार्वजनिक ठिकाणे आणि शाळांच्या परिसराची स्वच्छता राखण्यासाठी युवकांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून, दर आठवड्याला या उपक्रमातील सहभाग वाढत आहे.

तालुक्यात उपक्रम राबविण्याचे आवाहन
डॉ. अमित कदम यांनी केममधील युवकांचा आदर्श घेत तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींमध्येही असा उपक्रम राबवावा, असे आवाहन केले.
मनोज राऊत म्हणाले, केममधील युवकांनी कोणाच्याही सांगण्याची वाट न पाहता स्वयंस्फूर्तीने हा उपक्रम सुरू केला आहे. त्याच धर्तीवर दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रत्येक गावात हा उपक्रम राबविण्याचा मानस आहे.
माजी उपसरपंच सागर कुरडे म्हणाले, ‘‘गावाचा परिसर मोठा असून कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे स्वच्छता राखताना संख्याबळ कमी पडते. म्हणून युवकांनी स्वयंस्फूर्तीने हा उपक्रम हाती घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com