

वीस वर्षांपूर्वीच्या प्रकरणात
ज्ञानेशकुमारांची चौकशी
केरळमचे गृहमंत्री चेन्नथिला यांचा आदेश
तिरुअनंतपुरम, ता. ४ (पीटीआय) : केरळममध्ये २००६मध्ये झालेल्या रस्ते प्रकरण आणि मलेशियन कंत्राटदाराच्या मृत्यूप्रकरणात तत्कालीन सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आणि विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये दक्षता विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आल्याचे केरळममध्ये गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
ज्ञानेशकुमार केरळम केडरचे आयएएस अधिकारी असून, त्यांनी विविध विभागांचे सचिव म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त झाल्यानंतर त्यांनी राबविलेल्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरपडताळणी (एसआयआर) मोहिमेवरून त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर, त्यांच्यावर २० वर्षांपूर्वीच्या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. केरळ काँग्रेसचे नेते मलायिकीझू वेणुगोपाल यांनी या प्रकरणात तक्रार केली होती आणि या तक्रारीवरून चेन्निथला यांनी या प्रकरणाचा तपास दक्षता आणि लाचलुचपतविरोधी विभागाकडे सोपविला आहे. केरळम राज्य परिवहन विभागाच्या रस्त्याच्या कामांसंदर्भात एका मलेशियन अभियंत्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर दक्षता विभागाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, ही चौकशी पुढे सरकली नव्हती आणि त्याकाळात ज्ञानेशकुमार यांची संरक्षण मंत्रालयात बदली करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.