
पुणे/हडपसर - जातीपातीमध्ये भांडण लावून दिली जात आहेत, मूलभूत सुविधांपासून तुम्हाला वंचित ठेवले जात असल्याने शहरांचा सत्यानाश होत आहे. तुम्हाला चिखलामध्ये ढकलणाऱ्या राजकारण्यांनाच चिखलात टाका. मला कोणत्या खुर्चीचा आणि मुख्यमंत्री पदाच्या माळेचा लोभ नाही. महाराष्ट्राचे गतवैभव आणण्यासाठी माझ्याकडे सत्ता द्या, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.