esakal | खडकवासला धरण साखळीत सुमारे २९.७३ टक्के पाणीसाठा
sakal

बोलून बातमी शोधा

Khadakwasala Dam

खडकवासला धरण साखळीत सुमारे २९.७३ टक्के पाणीसाठा

sakal_logo
By
प्रशांत पाटील

खडकवासला - धरण साखळीतील पाऊस (Rain) मागील १५ दिवसापासून गायब झाला आहे. पावसाचा जोर फारच कमी झाला. परिणामी धरणाच्या (Dam) पाणीसाठ्यात फार मोठी वाढ होऊ शकली नाही. मंगळवारी दिवसभरात खडकवासला (Khadakwasala) येथे १५ मिलीमीटर पाऊस पडला तर उर्वरित पानशेत, वरसगाव व टेमघर या तिन्ही धरणात पाऊस झालाच नाही. (Khadakwasala Dam 30 Percentage Water Storage)

खडकवासला पाटबंधारे विभागाचे अधिकारी कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी सांगितले की, धरणाच्या परिसरात मे महिन्यात पाऊस पडला. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दमदार पाऊस पडला. परिणामी पानशेत, वरसगाव व टेमघर धरणात नवीन पाणी जमा होण्यास सुरुवात देखील झाली होती. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ ही सुरू झाली होती. पाऊस थांबल्याने धरण साठ्यात फार वाढ झालेली नाही. आज बुधवार दिनांक ७ जुलै २०२१ रोजी सकाळी पाच वाजता एकूण ८.६६ टीएमसी म्हणजे २९.७3 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

हेही वाचा: रवींद्र बऱ्हाटेला १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

धरणातील येवा कमी झाला

चार ही धरणात बुधवारी दि. १६ जून रोजी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरवात झाली. चार ही धरणात मिळून ६.६२ टीएमसी यंदाचा सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक होता. आज अखेर तो ८.६६ टीएमसी म्हणजे झाला आहे. म्हणजे २० दिवस आज अखेर दोन टीएमसीने जमा झालेला दिसत आहे. तर शहर परिसरातील विविध पाणी योजनेसाठी या २० दिवसात सुमारे अर्धा टीएमसी पाणी सोडले आहे. अशा प्रकारे एकूण अडीच टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. पानशेत, वरसगाव व टेमघर मध्ये सरासरी २० ते ७० क्युसेक पर्यत येवा(डोंगर दऱ्यातील पाणी ओढ्यातून धरणात पाणी जमा होण्याची प्रक्रिया) सुरु झाला होता.

बुधवारी सकाळी पाच वाजता चार ही धरणातील पाणी साठ्याची स्थिती :

धरणाचे नाव- एकूण क्षमता (टीएमसी) / उपयुक्त साठा (टीएमसी) / टक्केवारी

खडकवासला- १.९७ / ०.६६ / ३३.२१

पानशेत- १०.६५ / ४.२५/ ३९.९५

वरसगाव- १२.८२ / ३.१४ / २४.५२

टेमघर- ३.७१ / ०.६१ / १६.५२

चार धरणात एकूण- २९.१५ / ८.६६ / २९.७३

loading image
go to top