Warning : नदी पात्रातील वाहने बाहेर काढा; खडकवासलातून विसर्ग वाढण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

khadakwasala-dam

पानशेत, वरसगाव व टेमघर धरणात पाऊस वाढल्यास खडकवासला धरणातून १५ हजार क्युसेक पेक्षा जास्त विसर्ग वाढण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे.

Warning : नदी पात्रातील वाहने बाहेर काढा; खडकवासलातून विसर्ग वाढण्याची शक्यता

खडकवासला - पानशेत, वरसगाव व टेमघर धरणात पाऊस वाढल्यास खडकवासला धरणातून १५ हजार क्युसेक पेक्षा जास्त विसर्ग वाढण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे. खडकवासला धरणातून शुक्रवारी रात्री ८ वाजता १० हजार २४६ क्युसेक पाणी मुठा नदीत सोडले आहे.

सध्या पानशेत मधून तीन हजार ९०८ क्युसेक सोडले आहे. वरसगाव मधून एकूण पाच हजार ७१० क्युसेकचा विसर्ग सुरु आहे. टेमघर धरणातून एकूण ३५० क्युसेक असा नऊ हजार ९६८ क्युसेकचा विसर्ग सुरु आहे.

वरील तीन धरणातील आणि खडकवासला धरणात असे मिळून ११ हजार २५१ क्युसेक पेक्षा जास्त जमा होत आहे. खडकवासला विसर्ग १० हजार २४६ क्युसेक आणि कालव्यातून एक हजार पाच क्युसेकचा विसर्ग सुरु आहे. असा मिळून हा विसर्ग सुरु आहे.

नदीत १३ हजार क्युसेक पेक्षा जास्त पाणी असल्यास नदी पात्रातील रस्त्यावर पाणी जमा होण्यास सुरवात होती. १५ हजार क्युसेकला पाणी भिडे पुलाला पाणी धडकत असते. १५ ते १८ हजार क्युसेक ला बाबा भिडे पूल वाहतुकीला बुडतो. अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभगाचे सहाय्यक अभियंता योगेश भंडलकर यांनी दिली.

परिणामी शहरातील डेक्कन ते कसबा पेठ नदी पात्रात वाहने लावलेली असल्यास पाण्याबाहेर काढावीत असे आवाहन पालिका व पाटबंधारे विभ्गागाकडून केले जात आहे.

आता यापुढे दर तासाला रात्री ९, १०, ११, १२ या वाजता पानशेत, वरसगाव व खडकवासला धरणातील पाण्याची पातळी वाढल्यावर जास्तीचे पाणी सोडावे लागेल.

Web Title: Khadakwasala Dam Water Release 15000 Cusecs Plus

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :rainwaterKhadakwasala Dam