khadakwasala water
khadakwasala watersakal

खडकवासल्यात आत्तापर्यंतचे सर्वात गढूळ पाणी

गढूळता गेली २०० एनटीयू पर्यंत

पुणे : मुसळधार पावसामुळे प्रचंड प्रमाणात माती खडकवासला धरणात (khadakwasala dam)वाहून आल्याने पाणी गढूळ होण्याचे प्रमाण तब्बल २०० नेफोलोमॅट्रीक टर्बिडीटी युनिट (एनटीयू) पर्यंत गेले आहे. आत्तापर्यंत पावसाळ्यात एवढे गढून पाणी कधीही आलेले नव्हते. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर (public health) होऊ नये यासाठी जलशुद्धीकरण केंद्रांवर मोठ्याप्रमाणात औषधे (medisine) वापरावी लागत असल्याने त्याचा खर्चही वाढला आहे.

जुलै महिन्याच्या शेवटी पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेमघर (panshet and temhar dam) आणि वरसगाव या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील डोंगरावरील माती, शेतजमीन अक्षरशः खरडून निघाली आहे. ही सर्व माती खडकवासला धरणात आल्याने दरवेळेस पेक्षा जास्त पाणी गढूळ झाले आहे. धरणातील पाण्याला मातीचा गडद तांबडा रंग आलेला आहे. शहराला गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना माती मिश्रित पाणी मिळू नये यासाठी महापालिकेच्या (pune muncipal corporation) प्रयोगशाळेत गढूळता (एनटीयू) मोजली जाते. त्यावरून जलशुद्धीकरण केंद्रामध्ये क्लोरिन, आयोडीन यासह इतर औषधे वापरून पाणी शुद्ध केले जाते.

खडकवासला धरणातून महापालिकेच्या जलशुद्धीकरण (Water Purification Center) केंद्रामध्ये येणारे पाण्याची गढूळता ही २०० एनटीयू पर्यंत गेली आहे. हे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी प्रक्रिया करून या पाण्याची गढूळता ५ एनटीयूपेक्षा कमी केली जात आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरिन व इतर औषधे वापरण्याचे प्रमाण प्रचंड वाढले असल्याने जलशुद्धिकरणाचा खर्च देखील वाढला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यापूर्वी गढूळता होती १५० एनटीयू

२०१५-१६ मध्ये पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणी साठ्याने तळ गाठला होता. त्यावेळी महापालिकेला पाणी पुरवठा करताना गाळ वाहून येत असल्याने पाण्याची गढूळता १५० एनटीयू पर्यंत गेली होती. दरवर्षी पावसाळ्यात धरणे भरताना पाणी गढूळ होते. तेव्हा देखील १०० ते १५० इतकी एनटीयू गढूळता असते. मात्र, यंदा प्रथमच ही गढूळता २०० एनटीयूपर्यंत गेली आहे. नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक पाणी पुरवठा होऊ नये यासाठी महापालिकेकडून वारंवार प्रयोगशाळेत पाण्याची तपासणी केली जात असल्याने आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

एनटीयू म्हणजे काय ?

नेफोलोमॅट्रीक टर्बिडीटी युनिट (एनटीयू) या नावाने ओळखले जाणारे हे एकक पाण्यातील गढूळता मोजण्याचे प्रमाण आहे. एका लिटर पाण्यामध्ये एक

मिलीग्रॅम कारक घटक मिसळले असेल तर ते पाणी ३ एनटीयू एकका इतके गढूळ असल्याचे म्हटले जाते. याच प्रमाणात प्रयोगशाळेत पाण्याच तपासणी करून जलशुद्धीकरण केंद्रामध्ये रसायने वापरून गढूळता कमी केली जाते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com