

Khadakwasla Dam water level update
esakal
खडकवासला : खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पावसामुळे चारही धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून, सोमवारी (२७ जुलै) सायंकाळी ५ वाजेपर्यंत धरणसाखळीत एकूण २६.२६ टीएमसी (९०.०९ टक्के) पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, ९५.१४ टक्के भरलेल्या पानशेत धरणातून यंदाच्या हंगामात प्रथमच वीज निर्मितीसाठी ६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.