Khadakwasala Dam Water : खडकवासला धरणसाखळीत ५१ टक्के साठा; मुठा नदीपात्रात ०.२६ टीएमसी पाण्याचा विसर्ग

खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे चारही धरणांत एक हजार ४३१ एमसीएफटी (सुमारे १.४३ टीएमसी) पाण्याची आवक झाली.
Mutha River Flood

Mutha River Flood

sakal

Updated on

पुणे - खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे चारही धरणांत एक हजार ४३१ एमसीएफटी (सुमारे १.४३ टीएमसी) पाण्याची आवक झाली. त्यामुळे धरणसाखळीतील एकूण पाणीसाठा १४.९५ टीएमसीवर (५१.३० टक्के) पोहोचला. पाण्याच्या वाढत्या आवक वाढल्यामुळे खडकवासला धरणातून पहाटे टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवला. गुरुवारी (ता. ८) पहाटे २७ हजार २०३ क्यूसेकपर्यंत नेण्यात आला. त्यानंतर रात्री साडेदहा वाजता विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com