खडकवासला - खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये आज दिवस अखेर एकूण ५.४७ टीएमसी १८.७५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरण साखळीत ४.४२ टीएमसी म्हणजे १५.१६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. याचा अर्थ, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरण साखळीत एक टीएमसी अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. ही दिलासादायक बाब आहे.