खडकवासला - खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात जून महिनाअखेरीस पावसाने शंभरी गाठली आहे. वरसगाव धरणाच्या कोकण कड्यालगत असलेल्या परिसरात पाऊस झाल्याने किरकोळ आवक येऊन पाणीसाठ्यातही किंचित वाढ झाली आहे. .धरणसाखळी परिसरात पावसाचा जोर वाढल्याने चारही धरण क्षेत्रांत किरकोळ पर्जन्यवृष्टीची नोंद झाली. मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी ५ वाजेपर्यंत खडकवासला धरणात एकूण ८७ मिमी पावसाची नोंद झाली असून, साठा ०.३० टीएमसी (१४.९७ टक्के) इतका आहे..पानशेत धरण परिसरात १०२ मिमी पाऊस नोंदला गेला असून, साठा १.८१ टीएमसी (१६.९७ टक्के) आहे. वरसगाव धरणात ९८ मिमी पावसाची नोंद असून साठा १.५३ टीएमसी (११.९१ टक्के) आहे, तर टेमघर परिसरात १०२ मिमी पावसाची नोंद झाली असली तरी साठा शून्य टक्केच आहे. चारही धरणांमध्ये मिळून ३.६३ टीएमसी (१२.४५ टक्के) पाणीसाठा असून, गतवर्षी याच दिवशी तो १४.३३ टीएमसी (४९.१५ टक्के) होता..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.