Khadakwasla Dam : धरण साखळीत पाणीसाठा वाढला; पुणे शहरासह जिल्ह्यासाठी दिलासादायक स्थिती
Dam Water Level : खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये ६० तासांत सव्वा टीएमसीहून अधिक पाणीसाठा वाढला असून, ही वाढ पुणे जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्यासाठी दिलासादायक आहे.
खडकवासला : खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये मागील ६० तासांत सुमारे सव्वा टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा वाढला आहे. पुणे शहर व जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही वाढ दिलासादायक मानली जात आहे.