esakal | खडकवासला धरणातील विसर्ग ३१ हजार ४४९ क्‍युसेकवर
sakal

बोलून बातमी शोधा

खडकवासला धरणातील विसर्ग ३१ हजार ४४९ क्‍युसेकवर

खडकवासला धरणातील विसर्ग ३१ हजार ४४९ क्‍युसेकवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खडकवासला - धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी सायंकाळपासून बुधवारी दिवसभर पावसाचा जोर होता. परिणामी पानशेत, वरसगाव धरणातील विसर्ग वाढला. त्यामुळे खडकवासला धरणातील विसर्ग बुधवारी सायंकाळी पाच वाजता ३१ हजार ४४८ क्‍युसेकपर्यंत वाढविला.

बुधवारी सायंकाळी पाच वाजता अकरा तासांत खडकवासला धरणात १७ मिलिमीटर पाऊस पडला. पानशेत, वरसगाव व टेमघर येथे प्रत्येकी ४७ मिलिमीटर पाऊस झाला. पानशेतमधून ६ हजार १३२ क्‍युसेक, वरसगावमधून १२ हजार ९८५ क्‍युसेक व टेमघरमधून २५० क्‍युसेक असे २० हजार क्‍युसेक पाणी थेट खडकवासला धरणात जमा होत आहे. खडकवासला धरणात बुधवारी पहाटे सहा ते संध्याकाळी पाच वाजता १७ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे, खडकवासला धरणातील येवा (आवक) ही दहा हजार क्‍युसेकपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ३१ हजार ४४९ क्‍युसेकचा विसर्ग सोडण्याचा निर्णय घेतला. यासाठी खडकवासला धरणाचे अकरा दरवाजे साडेतीन फुटांनी उघडले आहेत.

loading image
go to top