खडकवासला धरण बुधवारी भरणार; मुठा नदीत पाणी सोडणार

khadakwasla-dam
khadakwasla-dam

खडकवासला - खडकवासला धरणात मंगळवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यत 1.93 टीएमसी म्हणजे 97.60 टक्के पाणी जमा झाले होते. त्यावेळी धरणात 1600 क्यूसेकचा येवा आहे. तो उद्या बुधवार पर्यंत कायम राहिल्यास सकाळी धरण भरेल. त्यानंतर धरणातून मुठा नदीत पाणी सोडावे लागण्याची शक्यता खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी वर्तविली आहे.

खडकवासला धरण भरण्यास 0.040 टीएमसी म्हणजे 40 दशलक्ष घन फूट पाणी साठण्याची आवश्यकता आहे. दर चार तासाला 10 दशलक्ष घन फूट पाणी धरणात जमा होत आहे. मंगळवारी रात्री पाऊस पडला नाही. सध्याच्या येवा कायम राहिल्यास धरण पूर्ण भरण्यास आणखी 16 तास वेळ आहे. म्हणजे बुधवारी सकाळी धरण पूर्ण भरेल. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाटील म्हणाले, "सोमवारी रात्री धरण क्षेत्रात पावसाचा जोर चांगला होता. पण मंगळवारी सकाळ पासून पावसाचा जोर रात्री दहा वाजेपर्यंत कमीच होता. पावसाचा जोर कमी असल्याने धरणातून किमान एक क्यूसेकचा विसर्ग मुठा नदीत सोडला जाईल."

मंगळवारी संध्याकाळी मागील 24 तासात खडकवासला येथे 17, पानशेत येथे 21, वरसगाव येथे 21 व  टेमघर येथे 28 मिलिमीटर पाऊस पडला आहे.

आठ दिवसात दुप्पट पाणीसाठा
मागील आठवड्यातील सोमवारी दि. 3 ऑगस्ट रोजी चार ही धरणात मिळून 9.81 टीएमसी पाणीसाठा होता. या आठदिवसात पाऊस पडल्याने धरणातील पाणी साठा दुपटीने वाढला. म्हणजे 18.42 टीएमसी झाला आहे. या आठ दिवसात सुमारे नऊ टीएमसी पाणी वाढले. आणि पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

मंगळवारी संध्याकाळी पाच वाजताची धरणातील पाण्याची स्थिती -
धरणाचे नाव - धरणाचा उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी मध्ये) / आज अखेर जमा उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी मध्ये) / टक्केवारी
खडकवासला- 1.97/1.93/97.60
पानशेत- 10.65/7.43/69.75
वरसगाव- 12.83/7.42/57.88
टेमघर- 3.71/1.64/44.14
चार ही धरणाची मिळून उपयुक्त पाणीसाठा 29.15 टीएमसी आज अखेर उपयुक्त जमा पाणीसाठा 18.42 टीएमसी 63.15 टक्के

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com