
पुणे : पुणे शहराला खडकवासला व भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा केला जात असताना त्यातील तब्बल ४० टक्के पाण्याची गळती होत होती. पण आता समान पाणीपुरवठा योजनेतून केल्या गेलेल्या उपाययोजनांमुळे पाण्याची गळती कमी होत असून, ती आता ३२ टक्क्यांवर आली आहे. महापालिकेने आगामी २०२५-२६ या वर्षाचे पाण्याचे अंदाजपत्रक तयार केले असून, त्यात गळतीचे प्रमाण कमी दाखवले आहे. दरम्यान, पुढील वर्षासाठी पाटबंधारे विभागाकडे ८१ लाख ६४ हजार ८६८ लोकसंख्येसाठी २१.०३ टीएमसी पाण्याची मागणी केली जाणार आहे.