
पुणे : खडकवासला धरणसाखळीमध्ये आठ दिवसांमध्ये १६.२९ टक्के म्हणजेच ४.७५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा वाढला आहे. धरणसाखळीत जून महिन्यापासूनच चांगला पाऊस झाल्याने जुलै महिन्यात पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. सध्या धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे.