

पुणे, ता. ११ : पुणे शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या खडकवासला धरणाची गाळामुळे साठवण क्षमता घटली आहे. ती पूर्ववत करण्यासाठी केंद्र सरकारने संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केली.
राज्यसभेतील विशेष उल्लेखाद्वारे त्यांनी या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. खडकवासला धरणाची मूळ साठवण क्षमता सुमारे ३.७५ टीएमसी होती. मात्र, साचलेल्या गाळामुळे ती निम्म्यापेक्षा अधिक घटून सध्या सुमारे १.७५ टीएमसी इतकी राहिली आहे. साठवण क्षमता घटल्याने पावसाळ्यात उपलब्ध पाणी साठविण्यासह पावसाळ्यानंतर पुण्याची वाढती पाण्याची गरज भागविण्यावर मर्यादा येत आहेत. विशेषतः कमी पावसाच्या वर्षांत याचा जलव्यवस्थापनावर मोठा परिणाम होऊ शकतो. धरणातील गाळ काढणे, जलाशयाचे आधुनिकीकरण आणि प्रभावी जल अंदाजपत्रक तयार करणे, अशा उपाययोजनांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करावा, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.