Khadakwasla Dam: खडकवासलातून वाढविला विसर्ग; दुसऱ्या दिवशीही नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Pune Flood: पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग वाढवण्यात आला असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वरसगाव, पानशेत व खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता.
पुणे/खडकवासला : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्याने दुसऱ्या दिवशीही जलसंपदा विभागाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. खडकवासला धरणातून सोमवारी सायंकाळी सात वाजता २८ हजार ६६२ क्यूसकने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू केला.