

Pune
esakal
पुणे: खडकवासला धरणातून मुठा उजव्या कालव्यात गेल्या दहा दिवसांपासून ७०० क्युसेकने सुरू असलेला पाण्याचा विसर्ग वाढत आता एक हजार क्युसेकने केला आहे. दौंड आणि इंदापूर तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी हा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.