

Khadakwasla Dam
esakal
खडकवासला: खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणातून मुठा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग शुक्रवारी (दि. ३१) दुपारी १ वाजता २२,८८० क्युसेक्सवरून वाढवून २७,२०३ क्युसेक्स करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ७ आणि ८ जुलै रोजी सोडण्यात आलेल्या विसर्गाइतकाच विसर्ग अवघ्या महिन्याभरात पुन्हा केला जात असून, पानशेत व वरसगाव धरणांतून येणाऱ्या पाण्याची भर पडत असल्याने परिस्थितीनुसार हा विसर्ग २५ हजार ते ३० हजार क्युसेक्स पर्यंत वाढविण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.