Khadakwasla Dam: खडकवासला धरणातील विसर्ग ४,७०८ क्युसेक; धरणसाखळीत ७८.४९ टक्के पाणीसाठा; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Khadakwasla Dam Discharge Reduced: धरणसाखळीत ७८.४९ टक्के पाणीसाठा असून, पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन केले आहे.
Khadakwasla Dam

Khadakwasla Dam

esakal

Updated on

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला: खडकवासला धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने घटत असल्याने धरणाच्या सांडव्यावरील पाण्याचा विसर्ग कमी करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. आज (शुक्रवारी) सकाळी ८ वाजल्यापासून सध्या सुरू असलेला ९,४०५ क्युसेक विसर्ग कमी करून ४,७०८ क्युसेक करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com