
पुणे आणि परिसरात सध्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. खडकवासला धरण साखळीतील धरणं जवळपास 90% पेक्षा जास्त भरली असून, खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जलसंपदा विभागाने पुणेकरांना सावधगिरीचा इशारा देत नदीकाठच्या परिसरात जाण्यास मनाई केली आहे. या परिस्थितीमुळे शहरात सतर्कतेचं वातावरण आहे.