

The Maharashtra government has assured speedy implementation of key irrigation and water infrastructure projects benefiting Pune district.
Sakal
प्रकाश शेलार
खुटबाव ( पुणे) : खडकवासला ते फुरसुंगी बोगदाचे काम मार्च २०२९ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. तसेच जनाई शिरसाई ३४९ कोटी रुपये किंमतीच्या बंद नळी योजनेचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. आज दौंडचे आमदार राहुल कुल यांनी लक्षवेधी द्वारे सरकारचे लक्ष पाणी या विषयावरील प्रलंबित प्रश्नांकडे वेधले. आमदार कुल यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना मंत्री विखे यांनी विधानभवनात उत्तरे दिली.