
पुणे : भीमा खोऱ्यातील जिल्ह्यातील बहुतांश धरणांमध्ये सध्या पाणीसाठा निम्म्यापेक्षाही कमी आहे. तसेच, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली असून, सध्या केवळ 33 टक्के म्हणजे 9.61 अब्ज घनफूट (टीएमसी) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
यंदाच्या पावसाळ्यात भीमा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. गेल्या 24 तासांमध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्र पाऊस झाला नाही. खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. परंतु परिसरात काही प्रमाणात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. या प्रकल्पात सध्या सुमारे 33 टक्के इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी खडकवासला प्रकल्प या तारखेस सुमारे 51 टक्के म्हणजे 14.83 टीएमसी पाणीसाठा होता.उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा सुमारे अर्धा टीएमसी म्हणजे एक टक्के इतका आहे. पिंपळगाव जोगे, नाझरे या धरणांमध्ये पाणीसाठा शून्यावरच आहे.
भीमा खोऱ्यातील धरणांतील पाणीसाठा टीएमसीमध्ये (कंसात टक्केवारी) :
माणिकडोह 0.96 (9.48)
डिंभे 4.21 (33.68)
घोड 1.22 (25.12)
चासकमान 1.17 (15.38)
भामा आसखेड 3.19 (41.57)
पवना 2.97 (34.96)
मुळशी 4.64 (25.13)
नीरा देवधर 2.65 (22.57)
भाटघर 8.67 (36.88)
वीर 3.66 (38.87)
उजनी 0.53 (0.98)
खडकवासला प्रकल्प :
टेमघर 0.67 (17.95)
वरसगाव 3.86 (30.15)
पानशेत 4.39 (41.25)
खडकवासला 0.69 (34.93)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.