Khadakwasla Theft : खडकवासला सोसायटीतील चार बंद सदनिका फोडल्या; ४ अज्ञात चोरट्यांकडून सुमारे दीड लाखांचा ऐवज लंपास!

Apartment Theft : खडकवासला सोसायटीत पहाटे चार बंद सदनिका फोडल्या गेल्या; रोख रक्कम आणि दागिने मिळून १.४४ लाख रुपयांचा ऐवज लंपास झाला. पोलिसांनी तपास सुरु केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पथक वापरून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
Four locked apartments in Khadakwasla society broken into; valuables worth ₹1.44 lakh stolen.

Four locked apartments in Khadakwasla society broken into; valuables worth ₹1.44 lakh stolen.

sakal

Updated on

खडकवासला : खडकवासला, ता. ३० : खडकवासला परिसरातील होमडेल सोसायटी येथे रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास झालेल्या घरफोडीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. चार अज्ञात चोरट्यांनी सोसायटीतील चार बंद सदनिकांचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत रोख रक्कम व ऐवज मिळून सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना नांदेड सिटी पोलीस ठाणे हद्दीत घडली असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. या प्रकरणी अनमोल आनंद घोष (वय १९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com