

Vehicle Inspection Drives in Khadakwasla
Sakal
निलेश चांदगुडे
किरकटवाडी : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्या कडक तपासणी मोहिमेदरम्यान खडकवासला येथे उभारण्यात आलेल्या चेक पोस्टवर कारवाई करण्यात आली. सोमवारी (ता. २९) सायंकाळी स्थिर सर्वेक्षण पथकाकडून करण्यात आलेल्या वाहन तपासणीदरम्यान एका कारमधून रोख रक्कम रुपये दोन लाख आढळून आली.