pune khadi machine chowk
sakal
पुणे - खडीमशीन चौक ते हांडेवाडी रस्त्यावरील बेफाम अवजड वाहतूक नागरिकांच्या जिवावर उठली असून, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हा परिसर मृत्यूचा सापळा बनला आहे. पिसोळीत धर्मावत पेट्रोल पंपाजवळ एका निष्पाप नागरिकाला नुकताच जीव गमवावा लागला. या वाहतूक कोंडी आणि अंधारलेल्या रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त असून, ‘महापालिका आणि वाहतूक पोलिसांना आणखी किती बळी हवेत?’ असा संतप्त सवाल रहिवासी विचारत आहेत.