

Maharashtra Police
ESakal
पुणे - अमली पदार्थांच्या गर्तेत सापडलेल्या तरुणांना कोठडीत पाठविण्याऐवजी, मायेचा हात देत पुन्हा उभे करण्याचा संवेदनशील प्रयोग पुणे पोलिसांनी यशस्वी केला आहे. परिमंडळ तीनने ‘एनडीपीएस’ कायद्यातील कलम ६४(अ) अंतर्गत १२ जणांना व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रात उपचार मिळवून दिले. त्यापैकी नऊ जणांना न्यायालयाने खटल्यातून कायदेशीर ‘डिस्चार्ज’ दिला आहे. त्यामुळे ‘खाकी’ वर्दीतील या संवेदनशीलतेने या तरुणांच्या जीवनात नवी उमेद निर्माण झाली आहे.