Crime_NIA
Crime_NIA

खलिस्थान समर्थकास NIAनं केली अटक; पुण्यातील एका प्रकरणी आढळला दोषी

Published on

पुणे : चाकण परिसरात बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी मागील वर्षी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) एका खलिस्थान समर्थकाला अटक केली होती. संबंधित प्रकरणात आणखी एकाचे नाव पुढे आले होते, त्यास बुधवारी (२३ डिसेंबर) 'एनआयए"ने दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. पुढील चौकशीसाठी त्यास मुंबई 'एनआयए"च्या ताब्यात देण्यात आले आहे.

गुरुजीतसिंग निज्जर (रा.पंडोरी सुखासिंग, अंजाला, अमृतसर, पंजाब)  असे अटक केलेल्याचे नाव आहे. निज्जर खलिस्थान समर्थक आहे. निज्जर हा शीख समुदायातील युवकांना जाळ्यात ओढत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. मागील वर्षी एनआयने चाकण येथून एका खलिस्थान समर्थकास अटक केली होती. त्याच्या चौकशीत निज्जरचे नाव पुढे आले होते. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर तो परदेशात पसार झाला होता.

दरम्यान, निज्जर हा समाजमाध्यमावर खलिस्थानची मागणी करणारे संदेश तो प्रसारित करत होता. त्याला पकडण्यासाठी लूक आऊट नोटीस बजावण्यात आली होती. मंगळवारी तो सायप्रसमधून विमानाने दिल्लीतील इंदिरा गांधी आंतराष्ट्रीय विमानतळावर उतरला. त्यावेळी एनआयएच्या पथकाने त्याला अटक केली. निज्जरला मुंबईतील एनआयएच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com